Hingoli|हिंगोलीत दोन लाखांचा गांजा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

चौघांवर औंढा पोलिस ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
Crime News
Crime Newsesakal

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात दोन लाख रुपये किंमतीचा साडेसहा किलो गांजा तसेच दोन दुचाकी जप्त करुन चौघांवर औंढा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२४) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येहळेगाव सोळंके शिवारात दोन दुचाकीवर आलेल्या चौघांकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, भगवान आडे, किशोर सावंत यांच्या पथकाने गुरुवारी (ता.२३) रात्री छापा टाकला.

Crime News
Marvel च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, TVSने आणलय थीम्स स्कूटर

यामध्ये दुचाकीवर असलेल्या चौघांची पोलिसांनी चौकशी सुरु केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या जवळ दोन लाख रुपये किंमतीचा ६.५० किलो गांजा सापडला. पोलिसांनी गांजा व दोन दुचाकी असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक खंडेराय यांच्या तक्रावरून एकनाथ शिंदे (रा.असोंदा), दत्तराव गारकर (रा. फुलदाभा) , कुंडलीक पवार , नरोजी बोरगड दोघे रा. नहाद यांच्या विरुध्द औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com