Marvel च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, TVSने आणलय थीम्स स्कूटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TVS Motors Marvel Theme Scooters
Marvel च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, TVSने आणलय थीम्स स्कूटर

Marvel च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, TVSने आणलय थीम्स स्कूटर

नवी दिल्ली : टीव्हीएस मोटारने (TVS Motor Company) Marvel च्या चाहत्यांसाठी जबरदस्त स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर मार्व्हलच्या काॅमिक पात्र स्पायडर मॅन आणि थोर यावर आधारित आहे. टीव्हीएस एनटोरक १२५ सीसी स्कूटरचे अनेक व्हेरिएंट अगोदरच मार्केटमध्ये आहे. यातीलच एक आहे Super Squad Edition.कंपनीने मार्व्हलचे काॅमिक पात्राच्या आधारावर या व्हेरिएंटच्या स्कूटरचे कलर थीम डिझाईन केले आहे. यात कॅप्टन अमेरिका (Captain America) आणि ब्लॅक पँथरवर (Black Panther) आधारित स्कूटर अगोदरच बाजारात आहे. आता स्पायडरमॅन आणि थोरची थीम असणारे स्कूटरही या व्हेरिएंटचा भाग असेल. (tvs launched spider man,thor theme ntorq 125 scooter)

हेही वाचा: Suzuki Burgman Street स्कूटर खरेदी करा १० हजारात

फिचर्स

काॅमिक कॅरेक्टरवर आधारित हे स्कूटर लाँच करण्यासाठी कंपनीने डिस्नी इंडियाबरोबर करार केला आहे. या व्हेरिएंटचे पहिले स्कूटर २०२० मध्ये लाँच झाले होते. कंपनीच्या सुपर स्क्वाॅड एडिशनवाले एनटोरक १२५ स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन असिस्ट, काॅलर आयडी आणि पार्किंग लोकेशन असिस्टसारखे अनेक नवीन फिचर्स उपलब्ध आहेत. दुसरीकडे या स्कूटरमध्ये १२४.८ सीसीचे इंजिन आहे. जे ६.९ केडब्ल्यू मॅक्सिमम पाॅवर आणि १०.५ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. बीएस ६ कंप्लायंट ही स्कूटर ५.८ लीटरच्या इंधन टाकीसह येते. यासह त्यात डायमंड कट व्हील आणि डिस्क ब्रेकही मिळते.

हेही वाचा: प्रतिक्षा संपली! पहिली इलेक्ट्रिक रिक्षा Mahindra Treo करा खरेदी

किंमत

टीव्हीएस एनटोरक १२५ च्या बेसिक माॅडलची दिल्लीतील एक्स-शोरुम किंत ७३.२७० रुपयांपासून सुरु होते. दुसरीकडे सुपर स्क्वाॅड एडिशनची किंमत ८३ हजार ८२५ रुपयांपासून सुरु होते. कंपनीची ही स्कूटर खूपच स्पोर्टी आहे.

टॅग्स :TVs Apache RTR 160 4V