Bidkin News : बिडकीनमधून दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता; पोलिसांची रात्रभर शोधमोहीम, नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १४) आली उघडकीस.
aayan shaha and arman shaha

aayan shaha and arman shaha

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १४) उघडकीस आली. घरातून बाहेर पडलेले आयान शाहरुख शहा (वय-१०) आणि अरमान शाहरुख शहा (वय-७) हे रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी बिडकीन पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन विशेष पथके तयार करून रात्रभर युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com