दोन महिन्यांनी बंदोबस्तावरून परतलेले जवान थेट विलगीकरण कक्षात, कुठे ते वाचा...

bal gat
bal gat
Updated on

हिंगोली ः मालेगाव, मुंबई येथे बंदोबस्तावरून परत आलेल्या येथील राज्य राखीव पोलिस बलातील १९० जवानांना सोमवारी (ता.२०) १४ दिवसांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षात राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येथील जवानांना नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी राज्यभरात बंदोबस्तासाठी जावे लागते. यातच दोन महिन्यापूर्वी हिंगोली राज्य राखीव बल गटाच्या १९० जवानांच्या दोन अलग तुकड्या करून त्यातील एक मालेगाव तर दुसरी तुकडी मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती. यामध्ये मालेगाव येथे ८३ जवान तर मुंबई येथे १०७ जवान बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र, त्यात ‘कोरोना’ची भर पडल्याने बाहेर राज्यातून, इतर जिल्ह्यातून परत आलेल्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी केली जाते आणि त्यांना १४ दिवस विलगीकरणमध्ये ठेवले जाते. बंदोबस्तावरून मालेगाव येथील ८३ जणांची तुकडी रविवारी हिंगोली येथे दाखल झाली. तर दुसरी मुंबईला गेलेली १०७ जणांची तुकडी सोमवारी सकाळी दाखल झाली. 

आरोग्य तपासणीत जवान ठणठणीत 
सध्या मुंबई, पुणे, मालेगाव येथे ‘कोरोना’ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने समादेशक मंचक इप्पर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना याबाबत कल्पना दिली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी बंदोबस्ताहून परत आलेल्या राज्य राखीव जवानांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ कदम यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने या सर्व जवानांची आरोग्य तपासणी केली असता सर्व जवान ठणठणीत असल्याचे दिसून आले. 

आरोग्य यंत्रणेने सोडला सुटकेचा मोकळा श्वास 
या वेळी बंदोबस्तावरून परतलेल्या १९० जवानांपैकी कोणालाही ‘कोरोना’ची साम्य असलेली लक्षणे दिसून आली नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा मोकळा श्वास सोडला. खबरदारी म्हणून जवानांना राज्य राखीव बल गट परिसरात स्वतंत्र तयार केलेल्या कक्षात १४ दिवसांसाठी विलगीकरण करून ठेवले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latur Usmanpura Fight Incident Parli Youth Dies Two Seriously Injured Police Probe Continues Into the Dispute
Paithan Godavari River Rescue Three Women Saved From Drowning by Two Young Men Who Showed Courage and Quick Thinking
Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Marathi News Esakal
www.esakal.com