
प्राप्त अहवालानुसार दोन
व्यक्तीचे स्वॅब पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांत परभणीतील मिलिंदनगर व पाथरी तालुक्यातील रामपूरीतील रुग्णांचा समावेश आहे.
परभणी : जिल्ह्यात बुधवारी (ता. तिन) राञी नांदेड येथील प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवालानुसार दोन
व्यक्तीचे स्वॅब पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांत परभणीतील मिलिंदनगर व पाथरी तालुक्यातील रामपूरीतील रुग्णांचा समावेश आहे.
मानवत शहरातील तिन व जिंतूर तालुक्यातील एक असे चार संशयितांच्या स्वॅबचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भिती निर्माण झाली असतांना बुधवारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून एकूण ३२ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे.
१९३ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत
सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील ३९ वर्षीय पुरूष, ब्रम्हवाकडी येथील २५ वर्षीय पुरूष व चिकलठाणा येथील २५ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. राञी गंगाखेड तालुक्यातील तिघांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे परभणीकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात बुुधवारी (ता. तिन) संशयितांची संख्या दोन हजार ४३१ पर्यंत पोचली आहे. १९३ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.
हेही वाचा - वीज मिटरचे रिडींग बील प्रिंटींग वाटप सुरू- दत्तात्र्य पडळकर
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची माहिती
एकूण दोन हजार ५८९ पैकी दोन हजार २०५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ८८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ७२ संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. ३३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण १९३ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातून बुधवारी एकूण १०२ जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
रामपुरी गाव प्रतिबंधीत जाहिर
मानवत तालुक्यातील रामपुरी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. गुरुवारी (ता. चार) सकाळी याठिकाणी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे अधिकारी तातडीने हे गाव प्रतिबंधित करून आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. रामपुरी ग्रामपंचायत व पंचायत समिती मानवत यांच्या अधिकारी देखील या गावात भेट दिली आहे.