जावयानं सासूला ट्रॅक्टरनं चिरडून खड्ड्यात पुरले; बीडमध्ये 13 दिवसांनंतर धक्कादायक प्रकार उघड

सुरेश रोकडे/संजय रानभरे
Saturday, 6 June 2020

बीड शहरातील महिला मांडवखेल येथे मुलीच्या सासरी आली होती. पती - पत्नीच्या भांडणात ती मध्यस्थी करत असल्याचा राग मानून जावायाने सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा निघृणपणे खून करत प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह खड्यामध्ये पूरला.

नेकनूर/घाटनांदूर (जि. बीड) - मागच्या तीन आठवड्यांत तिहेरी खुनाच्या दोन घटनानंतर शनिवारी (ता. सहा) बीड जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना घडल्या. जावयाने सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केल्याची घटना नेकनूर हद्दीतील मांडवखेल (ता. बीड) येथे उघडकीस आली. तर, दुसरी घटना डोक्यात दगड घालून ठार केल्याची घटना खापरटोन (ता. अंबाजोगाई) येथे घडली.
बीड शहरातील महिला मांडवखेल येथे मुलीच्या सासरी आली होती. पती - पत्नीच्या भांडणात ती मध्यस्थी करत असल्याचा राग मानून जावयाने सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा निघृणपणे खून करत प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह खड्यामध्ये पुरला. हे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पित्यास ताब्यात घेतले. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत.

हेही वाचा - बीडमध्ये दहा कोरोनामुक्, एक नवा रुग्ण

दुसरी घटना खापरटोन (ता. अंबाजोगाई) येथे घडली. बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरटोन येथील मंडप व्यावसायिक ज्ञानोबा सोपान मुसळे (वय ३५) यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून खुनानंतर त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने ढेचून चेहरा विद्रुप करून मृतदेह गावालगतच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कठड्यावर  टाकण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला आहे. बर्दापूर पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करत असून घटनास्थळास अंबाजोगाई उपविभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two murders in Beed district