Coronavirus : उदगीरमध्ये आणखी दोघे कोविडमुक्त

Two patients who recovered from coronavirus
Two patients who recovered from coronavirus

उदगीर (जि. लातूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयातून आज (ता. 30 मे) सायंकाळी दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, रुग्णालय प्रशासन यांनी कोरोना मुक्त झालेल्या 2 व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे आदी उपस्थित होते.
आतापर्यंत एकूण एकून 72 तरुणाची पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात उदगीर 69, जळकोट 2 तर अहमदपुर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी एकूण 47 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार संपल्याने घरी पाठवण्यात आले आहे. आत्तापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आता एकूण बावीस रुग्ण  उपचार घेत आहेत. यापैकी 14 रुग्णांना तोंडार पाटी (ता.उदगीर) येथील शासकीय वसतिगृहात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात 8 रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.
 

कडक उन्हात जीव धोक्यात घालून लढल्या रणरागिणी 

उदगीर  : रेडझोन असो की बाहेरून आलेल्या व्यक्ती.. संसर्ग झालेला आहे की नाही याची माहिती नसतानाही तपासणीसाठी दिवस-रात्र उभ्या राहून प्रचंड तापमानात तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर या रणरागिणींनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. 

उदगीर शहर व परिसरामध्ये निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत शासनाचे सर्व विभाग, अधिकारी डॉक्टर यांच्याही पलीकडे जाऊन थेट रुग्णांच्या समोर उभ्या राहून सर्वेक्षण व कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्याचे काम तालुका आरोग्य विभागाने केले आहे. त्यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना सोबतीला घेऊन शहर व परिसरात निर्माण झालेल्या १४ रेडझोन परिसरातील कुटुंबनिहाय नागरिकांची तपासणी करण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले आहे. 

कोरोनाचा रुग्ण गल्लीत आढळला असे ऐकल्यानंतर अंगात धडकी भरून घराची दारे बंद होऊ लागली आहे.या परिस्थितीत या संसर्ग झालेल्या रुग्णांना तपासून त्यांना कोरोना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर यशस्वी उपचार करणारे हात हे जाणीवेच्याही पुढे राबले असल्याने शहर व तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. तालुका आरोग्य विभागाचे हे अदृश्य हात खरोखरच जनतेच्या कौतुकास पात्र ठरणारे आहेत. 

तालुका आरोग्य विभागाअंतर्गत उदगीर तालुक्यात देवर्जन, हेर, वाढवणा, हाळी, न्ळगीर एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या कार्यालयांतर्गत शहरात तळवेस येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. शहर असो की ग्रामीण भाग जेथे-जेथे बाहेरून आलेले नागरिक, रेडझोन मधीच नागरीक व शहरातील रेडझोन मधील नागरिक यांचे कुटुंबनिहाय सर्वेक्षण करून त्यांची तपासणी करण्याचे काम या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी केले आहे. त्यामुळे संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची कुटुंबनिहाय तपासणी पूर्ण होऊ शकली. 

या आरोग्य पथकाने आत्तापर्यंत शहरातील रेडझोन असलेल्या खडकाळ गल्ली (२४३१), मुसानगर (९५९), मदिना नगर (१००), आनंदनगर (५०), गोविंदनगर (४०), हनुमान कट्टा (५१) अश्या एकूण ३६३१ कुटुंबांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन १९२१८ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. उदगीर तालुक्यातील सोमनाथपुर (५०), बोरताळा तांडा (९२), चिमाचीवाडी (११८), हंगरगा (५०), लोणी एमआयडीसी (६९), कासराळ (६०), कबीरनगर निडेबन (६७), देवर्जन (४३), वाढवणा (खु) (३८) अशा एकूण ५८७ कुटुंबातील ३१०८ नागरिकांची तपासणी केली आहे. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वाती सोनवणे-जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण गोरे, डॉ रमन येनाडले, डॉ स्नेहा बोबडे, डॉ विशाल पाटील, डॉ सिकंदर नेहाल, डॉ सुप्रिया चामलवाड ,डॉ रवि वाघमारे यांच्या पुढाकारातून या कर्मचाऱ्यांनी या तपासण्या पूर्ण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. 
 

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन भरपूर मेहनत घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे मात्र प्रत्येक शेफील्ड मध्ये राहून घरातील नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण करण्याचे काम तालुका आरोग्य विभागाच्या रणरागिणींनी केले आहे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. 
- प्रवीण मेंगशेट्टी, उपजिल्हाधिकारी उदगीर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com