तुळजापूर-उस्मानाबाद रस्त्यावर जीपने दुचाकीला उडवले, दोघे जण ठार | Osmanabad Accident Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Accident News

तुळजापूर-उस्मानाबाद रस्त्यावर जीपने दुचाकीला उडवले, दोघे जण ठार

तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : तुळजापूर-उस्मानाबाद रस्त्यावर बोलेरो जीपने दुचाकीस्वारास उडविल्यामुळे शहरातील दोघे जण ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.१६) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शी तसेच तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे कृष्णा दिलीप जितकर (वय २७, राहणार खटकाळ गल्ली, तुळजापूर), हनुमंत भगवान बंडगर ( वय ४५, राहणार वासुदेव गल्ली, तुळजापूर). दोघेही उस्मानाबादकडुन (Osmanabad) तुळजापूरकडे येत होते. (Two People Died In Accident On Tuljapur Osmanabad Road)

पाठीमागून येणाऱ्या बोलेरोने धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. उस्मानाबाद रस्त्यावरील समाधान धाब्याजवळ ही घटना घडली. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅ. क्षीरसागर यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत आहे, असे पोलीसांनी सांगितले.