दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

water accident.jpg
water accident.jpg


देगलूर, (जि.नांदेड) ः जयपूर (ता. देगलूर) येथील दोन शाळकरी मुले बुधवारी (ता.२५) रोजी पाडव्याच्या दिवशी शेततळ्यात पोहायला गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेमकी पाडव्याच्या दिवशी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संचारबंदीची अंमलबजावणी
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व शाळांना सुट्टी दिली गेली असल्याने बुधवारी (ता.२५) रोजी पाडवा सण असल्याने चैनपुर येथील गावकरी संचारबंदीची अंमलबजावणी करत असताना गावातील दोन शाळकरी मित्र दुपारी दोन वाजता किरण यादव पंदीलवाड (वय १४) इयत्ता आठवी व बजरंग जमनाजी कायतवाड (वय १५) इयत्ता नववी, श्यामका देवी आश्रम शाळा खानापूर हे दोघे घरच्यांची नजर चुकून शेताकडे गेले. शेतकरी मधुसूदन आवटी यांच्या शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरले. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या तळ्यात पाणीही मोठ्या प्रमाणात होते. 

कुटुंबीयांचा उदरनिर्वाह
त्या मुलांना पोहता येत नव्हते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी शेतमालक मधुसूदन आवटी हे शेताकडे गेल्यानंतर ही दुर्घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती देण्यात आली. याप्रकरणी देगलूर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही मुलांचे आई-वडील शेतमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात शासनाने पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

पाडव्याच्या आनंदावर विरजन
शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासाठी पाडवा हा सण उत्साहाचा व मुहूर्ताचा मानला जातो, मात्र जगावर कोसळलेल्या  ‘काेराेना’च्या महामारी संकटाने सर्वत्र हाहाकार माजला असतानाच हातावर पोट असणारे चैनपुर हे दोन पीडित कुटुंबही या संकटावर मात करीत संचारबंदीची अंमलबजावणी करीत घरीच बसले होते. मात्र नजर चुकून ते दोन चिमुकले शेताकडे गेले आणि ही दुर्घटना घडली. या दुःखाने अख्खे गाव शोकसागरात बुडाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com