

Kannad Tragedy Two Siblings Aged Two And Seven Die During Treatment After Falling Ill Following Khichdi Meal
esakal
कन्नड: घरी बनविलेली खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिंचोली लिंबाजी येथे घडली. आयुष नारायण थोटे (वय २) याचा गुरुवारी (ता. १०) मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असलेल्या गायत्री नारायण थोटे (वय ७) हिचाही आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.