फिलिपिन्स मधून आलेल्या दोन विद्यार्थीनी तर दुबईतून परतलेल्या दोघांवर उपचार

corona
corona

परभणी : फिलिपिन्स देशात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या दोन तरुणी शुक्रवारी (ता.१३) परभणीत घरी परतल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सध्या त्यांच्या घरीच आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे.

परभणी शहरातील दोन मुली फिलीपिन्स देशात शिक्षणासाठी होत्या. कोरोना विषाणू संसर्गमुळे या दोन्ही मुलींना परत परभणीत आणण्यात आले. शुक्रवारी या मुली परभणी दाखल झाल्या. त्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांच्या पथकाने या दोन्ही मुलींची तपासणी केली. सध्या त्यांना त्यांच्या घरी आरोग्य पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुढील १४ दिवस त्यांच्यावर आरोग्य विभागाचे पथक लक्ष असणार आहे.

दुबई येथून परतलेल्या दोघांवर खबरदारी म्हणून उपचार
सेलू : फर्टीलायझर कंपनीच्या वतीने कार्यशाळेत सेलू येथील दोन जण सहभाग नोंदवून दुबई येथून सेलू येथे नूकतेच परतले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी बुधवारी बोलावले होते. त्यांची अधिक तपासणी करण्यासाठी परभणी येथे त्यांना गुरूवारी पाठविण्यात आले. सेलू येथे तपासणी केली असता त्यांना कोरोनाचे कुठलेही लक्षणे आढळून आले नाहीत. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना परभणी येथील रूग्णालयात पाठविण्यात आल्याचे स्पष्टीकरण येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय हरबडे यांनी दिले.

सेलूत विशेष कक्ष स्थापन
राज्यात कोरोनाचे संशयित रूग्णांची संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी विशेष कक्ष गुरूवारी (ता.१२) स्थापन करण्यात आला आहे. प्रशासनाच्या सूचनेनूसार येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा बेडचा स्वंतत्र कक्ष कोरोना रूग्णांसाठी स्थापन करण्यात आला आहे. त्यात ऑक्सिजन आणि आवश्यक ती औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. 

कक्षाची केली अधिकाऱ्यांनी पाहणी
उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी या बाबत सर्व खबरदारी घेण्यासाठी येथिल उपजिल्हा रुग्णालयाच्या डाॅक्टरांशी फोनवरून संपर्क करून आढावा घेतला. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी या कक्षाची पाहणी केली आहे. 

सर्वच विभागांच्या बैठकावर बैठका
जिल्हाधिकारी कार्यालयासह आरोग्य विभाग आणि इतर विभागाच्या आढावा बैठका शुक्रवारी पार पडल्या. या बैठकीत कोरोना विषाणुच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याची माहिती घेण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com