Maharashtra Youth : वैजापूर तालुक्यातील ओम धनंजय धोर्डे आणि प्रतीक्षा भगवान जाधव यांची मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड झाली आहे. या फेलोशिपमधून दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कार्यरत होणार आहेत.
वैजापूर : तालुक्यातील दोघांची मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड झाली आहे. फेलोशिपसाठी निवडलेल्या ६० जणांच्या यादीत दोघांचा समावेश झाला आहे. ओम धनंजय धोर्डे (रा. डोणगाव) आणि प्रतीक्षा भगवान जाधव (रा. बायगाव) अशी निवड झालेल्यांची नावे आहेत.