esakal | ‘त्या’ अत्याचार प्रकरणातील दोघांची कोठडी वाढली 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

‘त्या’ अत्याचार प्रकरणातील दोघांची कोठडी वाढली 

sakal_logo
By
विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : शंकरनगर (ता. बिलोली) येथील सहावीतील मुलीवर अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या तिघांपैकी एकाची न्यायालयीन कोठडीत तर दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. बिलोली जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. यातील मुख्य आरोपी दयानंद राजूळे हा अद्याप फरार असून पिडीत मुलीवर उपचार सुरू आहेत.

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री साईबाबा प्राथमिक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेतील दोन शिक्षकांसह शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सय्यद रसुल यास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यास पहिल्यांदा पाच दिवसाची तर नंतर तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी असलेले मुख्याध्यापक प्रदीप पाटील व धनंजय शेळके यांना पोलिसांनी पूर्णा येथून अटक केल्यानंतर त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 

हेही वाचाBudget 2020 - अर्थसंकल्पाबाबत ‘काय’ म्हणतात नांदेडकर...वाचा...

मुख्य आरोपी सय्यद रसुलचा मुक्काम कारागृहात

या प्रकरणातील तीनही आरोपींची पोलिस कोठडी शनिवारी (ता. एक) संपल्याने त्यांना बिलोली जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात तीनही आरोपीना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी आरोपींच्या वकिलामार्फत करण्यात आली होती. मुख्य आरोपी असलेले सय्यद रुसून यास दोन वेळेला पोलीस कोठडी मिळालेली असल्यामुळे व त्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर आरोपींच्या वतीने बाजू मांडली. पोलिसांना आवश्यक असलेली माहिती संबंधित आरोपीच्या वकिलाकडून पोलिसांना प्राप्त झालेली असल्यामुळे आरोपी सय्यद रसूल यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

प्रदीप पाटील व धनंजय शेळकेंची कोठडी वाढली

मात्र या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप पाटील व धनंजय शेळके यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यावयाची असल्यामुळे व या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याने त्याला पकडायचे आहे म्हणून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी अशी बाजू पोलिसांच्या वतीने सरकार पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात मांडल्यामुळे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता. चार) वाढ केली आहे. तपास अहमदपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांच्यामार्फत करण्यात येत आहे. 

loading image