दोघांनी केला अत्याचार, एकाने बनवला व्हिडिओ

जगन्नाथ पुरी
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय विवाहितेने गुरुवारी दुपारी घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विवाहितेवर अत्याचार करत व्हिडिओ काढून बदनामी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सेनगाव(जि. हिंगोली) : तालुक्यातील साखरा येथील एका विवाहितेवर अत्याचार करत व्हिडिओ काढून बदनामी केली. या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १३) घडली. याप्रकरणी तीन अरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय विवाहितेने गुरुवारी दुपारी घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळतात पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, जमादार पद्माकर खंदारे, श्री. कऱ्हाळे यांनी धाव घेतली. प्रारंभी आकस्‍मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर तपास सुरू केला. मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. या वेळी महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी दोनपानी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे उघडकीस आले. 

हेही वाचा पतीने पेटवून दिलेल्या महिलेचा अखेर मृत्‍यू

आत्महत्येपूर्वी विवाहितेने लिहली चिठ्ठी

विवाहित महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे की, २२ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी दोन वाजता गावातील चंद्रभान गणपत कायंदे, सुरेश नामदेव कायंदे व परमेश्वर नारायण वावरे हे तिघे घरात आले. चंद्रभान आणि परमेश्वर या दोघांनी माझ्यावर अत्याचार केला व सुरेश याने व्हिडिओ काढला. त्यानंतर मला धमक्या देऊन सुरेशला फोनवर बोलायला लावले. त्याच्या सोबतही अनैतिकक संबंध ठेवायला मजबूर केले. मी त्या वेळेस गरोदर होते. 

पोटात दोन महिन्याचे बाळ

माझ्या पोटात दोन महिन्याचे बाळ होते म्हणून मी दबावाखाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलले. घरच्यांना ही गोष्ट कळली तर मला टाकून देतील. माझी शेवटची इच्छा आहे की, त्या तिघांना सजा द्या, माझ्यावर गुन्हा केला आहे. ज्यामुळे यापुढे असे गैरकृत्य गावात घडणार नाही, असे सापडेल्या चिठ्ठील लिहले आहे. दरम्यान, पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली आहे. अत्याचार करणाऱ्यानी बदनामी केली व आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार चिठ्ठीमुळे पुढे आला.

हे देखील वाचलेच पाहिजे वाहतूक पोलिसांनी सायकलवरून गाठले कार्यालय

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
 
 दरम्यान, सासर व माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शविली. अगोदर आरोपींविरुद्ध अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिस उपाधीक्षक ए. जी. खान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नातेवाइकांशी चर्चा केली. त्यानंतर रात्री उशिरा पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मयत विवाहितेच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पती, सासू, सासरा असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two tortured by one, video made by one