दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोघे जण गंभीर

हबीबखान पठाण
रविवार, 1 सप्टेंबर 2019

सफरचंद घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.एक) पहाटे तिनच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) येथील बाह्यवळण रस्त्यावर घडली.

पाचोड, ता.1(जि.औरंगाबाद) ः सफरचंद घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.एक) पहाटे तिनच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) येथील बाह्यवळण रस्त्यावर घडली.

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड येथील बाह्यवळण रस्त्याने ट्रक औरंगाबादकडून बीडकडे कांदे घेऊन जात असताना अचानक टायर फुटले. ते बदलण्याकरीता ट्रक चालकाने हा ट्रक रस्त्या कडेला उभा केला. तोच पाठीमागून सफरचंद भरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकच्या चालकाचे झोपेच्या गुंगीत ट्रकवरील नियंत्रण सुटले व रस्ताच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला त्याने पाठीमागुन जोरदार धडक दिली.

यात दोघे जण गंभीर जखमी झाले असुन सफरचंद घेऊन जाणाऱ्या ट्रकचा समोरील भागाचा संपूर्णतः चुराडा झाला. तर कांदे वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या पाठीमागील भागाचे नुकसान झाले. जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Trucks Accident, Two Injured