पाचोड - भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सत्तावीस वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना पाचोड- पैठण राज्य महामार्गावरील थेरगाव (ता. पैठण) जवळ कोल्हेवस्ती परिसरात बुधवारी (ता. १४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून सचिन भिकाजी गाढेकर रा. चिचोंली (ता. पैठण) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव आहे.