Latur : वलांडी-भालकी राज्यमार्गावर भीषण अपघातात २ तरुण ठार, १ गंभीर जखमी

सर्वसामान्य कुंटुबातील युवक अपघातात ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Latur Accident News
Latur Accident Newsesakal
Updated on

देवणी (जि.लातूर) : वलांडी-भालकी राज्यमार्गावर मंगळवारी (ता.18) रात्री साडेआठ वाजता बोंबळीजवळ झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत माहिती अशी, की वलांडी-भालकी राज्यमार्गावर वलांडीहुन बोंबळीकडे जात असलेली दुचाकी झाडाला धडकल्याने कैलाश मारोती कांबळे (वय 20 रा. बोंबळी बु,, ता. देवणी) व सत्यजीत कालिदास गायकवाड (वय -20 रा. वलांडी, ता. देवणी) हे दोघे जागीच ठार (Deoni) झाले आहेत. तर अमित सुभाष कांबळे (रा. बोंबळी खुर्द, ता. देवणी) गंभीर जखमी झाला आहे.(Two Youth Died, One Serious Injured In Deoni Taluka Of Latur)

Latur Accident News
लाय-डिटेक्टर असते तर... कन्हैय्या कुमार यांची नरेंद्र मोदींवर टीका

जखमीला वलांडी येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी देवणी येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वलांडीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वलांडी भालकी राज्यमार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात (Latur) दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याने गाडीचा नंबरही दिसत नसल्याची स्थिती आहे. सर्वसामान्य कुंटुबातील युवक अपघातात ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded: MLA Anandrao Patil Bondharkar, Superintendent of Police Dr. Neelabh Rohan, MLA Balajirao Kalyankar and jewellers during a meeting to discuss the issues faced by bullion traders.
Nanded: Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar with the officers and employees promoted at Swami Ramanand Teerth Marathwada University.
Bidkin police with the property recovered within 24 hours in the Lamgavhan house-breaking case.
Maharashtra Governor Haribhau Bagade addressing students at an felicitation ceremony in Phulambri.
Marathi News Esakal
www.esakal.com