
Hingoli : वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू, कळमनुरीतील घटना
कळमनुरी (जि.हिंगोली) : शहरानजीक कळमनुरी -बाळापुर मार्गावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ मंगळवारच्या (ता.चार) मध्यरात्री दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शहरातील शेख उमर शेख मोहम्मद (वय १८) व शेख मोहम्मद खाजा फैजान उमर फारूक (२१) हे दोघे जण शहरानजीक असलेल्या मोरवाडी येथून कळमनुरी (Kalamnuri) येथे येत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (ITI) समोर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात मंगळवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान झाला. या अपघाताचे वृत्त कळताच आजूबाजूच्या नागरिक व शहरातील काही युवकांनी तातडीने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. (Two Youths Died In Accident In Kalamnuri In Hingoli District)
हेही वाचा: 'मैने'ला पद्म पण केंद्राला अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठित वाटत नाहीत - रोहित पवार
पोलिस कर्मचारी रमेश कुंदर्गे, गुलाब जाधव, भीमा वाढवे, एम.जी.भडके, प्रशांत शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांनी अपघातात जखमी झालेल्या युवकांना उपजिल्हा रुग्णालयात (Hingoli) हलविले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फैजान उमर फारूक याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले तर गंभीर जखमी असलेल्या शेख उमर शेख मोहम्मद याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने नांदेड (Nanded) येथे पाठविण्यात आले मात्र नांदेड येथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Web Title: Two Youths Died In Accident In Kalamnuri In Hingoli District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..