स्कॉर्पिओ झाडावर आदळली; बीड जिल्ह्यात दोन तरुण ठार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

बीड जिल्ह्यात भरधाव स्कॉर्पिओ जीप झाडावर आदळल्यानंतर बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात पंकजकुमार अंधारे याचा जागीच मृत्यू झाला, तर ओंकार डोंगरे, दत्ता लांडगे, बाळू उबाळे, शुभम डरपे हे चौघेही गंभीर जखमी झाले. 

बीड -  भरधाव वेगातील स्कॉर्पिओ जीप झाडावर धडकून खड्ड्यात गेल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या म्हसोबा फाट्यावर बुधवारी (ता. एक) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या अपघातात अन्य तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंकजकुमार अंधारे (वय 25) व ओंकार डोंगरे (वय 24) अशी मृतांची नावे आहेत. 
शहरातील संत नामदेवनगर भागातील पंकजकुमार अंधारे, ओंकार डोंगरे यांच्यासह दत्ता लांडगे, बाळू उबाळे, शुभम डरपे हे पाच जण स्कॉर्पिओ जीपमधून (एमएच- 23, एडी- 5790) मंगळवारी (ता. 31) रात्री उशिरा जेवण करण्यासाठी म्हसोबा फाट्याच्या पुढे गेले होते.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

परत येत असताना पहाटे दोनच्या सुमारास भरधाव वेगात असलेली त्यांची जीप रस्त्याच्या लगत असलेल्या झाडावर आदळली. झाडावर आदळल्यानंतर गाडी बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात पंकजकुमार अंधारे याचा जागीच मृत्यू झाला, तर ओंकार डोंगरे, दत्ता लांडगे, बाळू उबाळे, शुभम डरपे हे चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

ओंकारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास औरंगाबादला हलविण्यात आले; मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असताना ओंकार डोंगरे याचाही मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths killed in Beed district

Tags
टॉपिकस
Topic Tags: