इथे झाली ३६ कॉपीबहादरांवर कारवाई

file photo
file photo

नांदेड : बारावी बोर्ड परीक्षेत सोमवारी (ता.२४) कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या पेपरला जिल्ह्यातील एकूण सात परीक्षा केंद्रांवर ३६ कॉपीबहादरांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कॉपीमुक्तीविषयी जागृती करण्यात येत असली तरी एकाच दिवशी ३६ कॉफीबहाद्दर परीक्षार्थींवर लातूरच्या पथकाने केलेल्या कारवाईने कॉपीमुक्तीला मात्र, हरताळ फासला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्‍या परीक्षेसाठी विविध फिरत्या व बैठे पथकांसह जिल्‍हा परिषदेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉपीमुक्‍ती अभियानासाठी परिश्रम घेत आहेत. सोमवारी (ता.२४) सकाळच्‍या सत्रात विज्ञान शाखेचा भौतिकशास्‍त्र व वाणिज्‍य शाखेचा सचिवाची कार्यपद्धती या विषयाचा पेपर होता. यासाठी जिल्‍हयात एकूण २० हजार १२५ विद्यार्थ्‍यांपैकी १९ हजार ७६९ विद्यार्थ्‍यांनी परीक्षा दिली, तर ३५६ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते.


या परीक्षा केंद्रावर घडला हा प्रकार-
जिल्‍हयातील पाच परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करणाऱ्या २९ विद्यार्थ्‍यांना रेस्‍टीकीट करण्‍यात आले. यात कुरुळा (ता. कंधार) येथील श्री शिवाजी विद्यालय येथे सहा विद्यार्थ्‍यांवर कारवाई करण्यात आली. कंधार तालुक्‍यातील गांधीनगर येथील पोस्‍ट बेसिक ज्‍युनिअर कॉलेजचे चार, शेकापूर येथील महात्‍मा फुले विद्यालयाचे तीन, मुखेड तालुक्‍यातील वसंतनगर कोटग्‍याळ येथील सेवादास विद्यालयाचे आठ, तर मुखेड तालुक्‍यातील उमरदरी येथील नरसिंह विद्यालयाच्‍या आठ विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.


इतक्या विद्यार्थ्यांनवर कारवाई-
दुपारच्‍या सत्रात कला शाखेच्या राज्‍यशास्‍त्र विषयाच्या पेपरला २० हजार ४८४ विद्यार्थ्‍यांपैकी १९ हजार ६९१ विद्यार्थ्‍यांनी परीक्षा दिली, तर ७९३ विद्यार्थी अनुपस्थित होते. राज्‍यशास्‍त्र पेपर दरम्‍यान गैरप्रकार करणाऱ्या सात विद्यार्थ्‍यांना कारवाई करण्यात आली. यामध्ये कुरुळा येथील श्री शिवाजी विद्यालयाचे पाच तर बाऱ्हाळी येथील विद्याविकास विद्यालयाचे दोन विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.

वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर-
बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या व्हाट्ॲपवर फिरल्याने यंत्रणा डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर, प्रशांत दिग्रसकर यांच्‍यासह शिक्षण विभागातील अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी विविध परीक्षा केंद्रांना आज भेटी देऊन पहाणी केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com