esakal | उदगीरला पावसामुळे उडीद, सोयाबीनचे नुकसान, पाणीसाठ्यात मात्र वाढ नाही
sakal

बोलून बातमी शोधा

27bedp15_201910317331

गेल्या चार दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस होत आहे. तालुक्यातील तलाव, ओढे-नाले भरण्याएवढा जरी पाऊस नसला तरी या पावसाने उडीद, सोयाबीन या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

उदगीरला पावसामुळे उडीद, सोयाबीनचे नुकसान, पाणीसाठ्यात मात्र वाढ नाही

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : गेल्या चार दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस होत आहे. तालुक्यातील तलाव, ओढे-नाले भरण्याएवढा जरी पाऊस नसला तरी या पावसाने उडीद, सोयाबीन या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सोमवारी (ता.१४) रात्री तालुक्यातील आठ महसूल मंडळात एकूण सरासरी साडेबावीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तालुक्यातील तिरू, देवर्जन, उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भोपणी (ता.देवणी) या मध्यम प्रकल्पासह अनेक साठवण तलाव व पाझर तलाव अद्यापही भरले नाहीत. सध्या तालुक्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा असताना मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने यामुळे पाणीसाठा वाढण्याऐवजी नगदी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी निर्माण झालेली अतिवृष्टी सारखी परिस्थिती या वर्षी निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यावर्षीचे ही सोयाबीनचे क्षेत्र पावसामुळे हातचे जाण्याच्या मार्गावर आहे.

हेडमास्तर होण्यासाठी आठशे शिक्षकांची नकारघंटा, पदोन्नतीला सतराशे विघ्न

अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीला आले आहे तर अनेक ठिकाणी सोयाबीनचे क्षेत्र हे अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पावसाची शेतकऱ्यांना भीती निर्माण झाली आहे. सोमवारी (ता.१४) रात्री तालुक्‍यातील आठ महसूल मंडळात झालेला पाऊस कंसातील आकडे आतापर्यंत झालेला एकूण पाऊस असा, उदगीर २३ (७५७), नागलगाव २५ (५४७), मोघा ४६ (७३४), हेर १८ (५६२), वाढवणा १५ (६५५), नळगीर १७ (६७९), देवर्जन १८ (५८८), तोंडार १६ (५८२) असे एकून पर्जन्य १७८ मिमी, तर एकूण सरासरी पर्जन्य ६३६.६२ मिमी झाल्याची नोंद झाली आहे.

नुकसानीचे पंचनामे करा
उदगीर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पावसाने उडीद, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच पावसाचे प्रमाण कमी व त्यात काढणीच्या वेळी होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर