Uday Samant : बीडला ७४ उद्योगांसोबत सामंजस्य करार; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती ६ हजार रोजगार शक्य
Beed News : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बीड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ७४ उद्योग कंपन्यांसोबत ९३० कोटी ११ लाख रुपयांचे सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून ६ हजारांहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
बीड : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १६) झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ७४ उद्योगांसोबत ९३० कोटी ११ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. प्रस्तावित गुंतवणुकीतून ६०३६ रोजगार उपलब्ध होणार आहेत.