

Uddhav Thackeray Criticizes October 5 Drought Panchnama Plan And Says Shiv Sena Leaders Will Tour Maharashtra
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘राज्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. पण, मुख्यमंत्री ऑक्टोबरनंतर पंचनामे करणार, असे सांगत आहेत. दुष्काळग्रस्तांना तातडीच्या मदतीची गरज असताना हा मुहूर्त तुम्ही पंचांग पाहून काढला का?’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘तुम्ही पंचांग पाहून पंचनामे आणि मदत करणार असलात तरी शेतकरी मुहूर्त पाहून आत्महत्या करत नाही’, असा संतापही ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केला.