

49 Udgir buses sent to Konkan, disrupting local services.
Sakal
उदगीर : गणेशोत्सव व महालक्ष्मी सणानिमित्त कोकणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उदगीर आगारातील तब्बल ४९ बसेस कोकणात पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उदगीर आगारातील उपलब्ध बसगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने स्थानिक तसेच ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून, उदगीर बसस्थानकावर प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.