Lok Sabha Poll : उमरगा, लोहारा विधानसभा मतदारसंघात सांयकाळी पाच पर्यंत ५१. ६९ टक्के मतदान

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील उमरगा, लोहारा विधानसभा मतदार संघात मंगळवारी (ता. सात) सकाळी सात पासूनच मतदारानी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.
 umarga lohara lok sabha election voting of till 5 only 51 percent
umarga lohara lok sabha election voting of till 5 only 51 percentSakal

उमरगा : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील उमरगा, लोहारा विधानसभा मतदार संघात मंगळवारी (ता. सात) सकाळी सात पासूनच मतदारानी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान सकाळी सात ते नऊ या दोन तासात केवळ ५.४० टक्के मतदान झाले होते. तर नऊ ते अकरा या वेळेत मतदानाचा टक्का थोडा वाढला होता.

या वेळेत १७.५२ टक्के मतदान झाले. दरम्यान दुपारी एक पर्यंत ३२ टक्के मतदान झाले. तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४१.२८ इतकी होती. तर सांयकाळी पाचपर्यंत ५१.६९ टक्के मतदान झाले होते. कांही मतदान केंद्रावर सहानंतरही मतदान सुरु होते.

उमरगा, लोहारा तालुक्यात तीन लाख दहा हजार ७०३ मतदार संख्या आहे. मतदारसंघात ३१५ केंद्र असून उमरगा तालुका २२९ तर लोहारा तालुका ९४ मतदान केंद्र आहेत. मंगळवारी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर व सालगडी असलेल्या मतदारांनी सकाळच्या टप्यात मतदानासाठी गर्दी केली होती. यंदा नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत होते.

प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व जेष्ठ नागरिक असलेल्या मतदारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाचा पारा अधिक असल्याने बहुतांश जेष्ठ नागरिकांनी सकाळी अकरापर्यंत मतदानासाठी गर्दी केली होती.

दरम्यान उमरगा शहरातील कुमारस्वामी, शरणाप्पा मलंग विद्यालय, जिल्हा परिषद शाळा,भारत विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, जकापूर कॉलनी, शेंडगे स्कूल, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सखी महिला केंद्रात मतदारांची गर्दी होती.

आमदार ज्ञानराज चौगुले, सौ. ज्योतीताई चौगुले यांनी शहरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्याजवळील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी बलसुर येथील मतदानाचा हक्क बजावला.

माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी शहरातील जिल्हा परिषद जुनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी औसा येथे मतदान केले. राज्याचे क्रिडा मंत्री संजय बनसोडे यांनी उमरगा शहरातील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी प्रा. सुरेश बिराजदार, दिग्विजय शिंदे, श्रीकांत पतगे आदी उपस्थित होते.

मतदान प्रक्रिया शांततेत

मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत ज्यास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी महिला मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

मतदान केंद्रात केंद्राध्यक्षापासून इतर सर्व कर्मचारी महिलाच असणार असून या संपूर्ण केंद्राची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आलेली आहे. शहरातील गटशिक्षण कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर सखी महिला मतदान केंद्रात महिला कर्मचाऱ्यांनी निवडणुक प्रक्रिया व्यवस्थित हाताळली.

दरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे (उमरगा), तहसीलदार काशिनाथ पाटील (लोहारा), नायब तहसीलदार रतन काजळे, डॉ. अमित भारती यांनी व्यवस्थित नियोजन केले होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर आदींनी मतदान केंद्र व परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. कोठेही अनुचित प्रकार घडलेला नसल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com