Umarkhed Election : उमरगा पालिकेतील 'त्या तीन' जागेच्या निवडणुकीला स्थगिती; २० डिसेंबरला होणार मतदान!

Local Body Elections : उमरगा नगरपालिकेतील तीन प्रभागांची निवडणूक न्यायालयीन स्थगितीमुळे २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या उमेदवारांना संधी न देता विद्यमान उमेदवारांसाठीच मतदान होणार असल्याने क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे.
Revised Polling Schedule Announced for Three Umarkhed Municipal Wards

Revised Polling Schedule Announced for Three Umarkhed Municipal Wards

esakal

Updated on

उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक चार ब, प्रभाग क्रमांक पाच अ आणि प्रभाग क्रमांक अकरा अ या तीन जागांसाठी निवडणूक विभागाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.  या जागांसाठी आता २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार  आहे. दरम्यान उमरगा पालिकेत एकुण २५ सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया होती. परंतू न्यायालयीन प्रक्रियेमुळे तीन जागांची निवडणूक तूर्त स्थगित झाली असून उर्वरित २२ जागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी नियोजित वेळेप्रमाणे मंगळवारी (ता.दोन) मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com