election campaign
sakal
उमरगा - नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्यक्षात आणखी उमेदवारी अर्ज भरलेले नसलेल्या पण संभाव्य उमेदवार असणाऱ्या विविध राजकिय पक्षाच्या इच्छुकांनी सोशल मिडीयावर प्रचाराचा धूराळा उडवल्याचे चित्र दिसत आहे.
पालिका निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत तडजोड करून 'महायुती' ने मतदारासमोर जाण्याच्या दृष्टीने निर्णय घेतलेला दिसत असला तरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ठरणार आहे. त्यात शिवसेना कि भाजपाला जागा सूटते हे पहावे लागेल. महाविकास आघाडीतही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून घोडं अडलेले दिसत आहे.