esakal | लोकनेते विलासरावांचे पाय जिथे लागले तिथल्या शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे, अमित देशमुखांची भावनिक साद
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Deshmukh

स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांनी मारुती महाराज साखर कारखान्याला जन्म दिला आहे. यामुळे मी या कारखान्यावर येतो.

लोकनेते विलासरावांचे पाय जिथे लागले तिथल्या शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे, अमित देशमुखांची भावनिक साद

sakal_logo
By
गौस शेख

बेलकुंड (जि.लातूर) : श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चाचणी गळीत हंगाम मार्च महिन्यात झालाच पाहिजे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता.१६) दिला. बेलकुंड (ता.औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्यास भेट देऊन तेथे कारखाना सुरू करण्याच्या संदर्भाने सुरू असलेल्या कामाची पाहणीप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत बाजुळगे, उपाध्यक्ष श्याम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, अॅड. समद पटेल, डॉ.अरविंद भातांब्रे, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, सुधीर पोतदार, हरिराम कुलकर्णी, प्रदीप चव्हाण, प्रवीण कोपरकर, अमित माने, सुरेश भुरे, राजेंद्र मोरे, दत्तोपंत सुर्यवंशी आदीं उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले की, मारूती महाराज साखर कारखाना सुरू झाल्यानंतर येणारे दोन - तीन गळीत हंगाम विक्रमी झाले पाहिजे.

तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांनी मारुती महाराज साखर कारखान्याला जन्म दिला आहे. यामुळे मी या कारखान्यावर येतो. स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांचे पाय जिथे लागले तिथल्या शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे. म्हणून कर्तव्याच्या भावनेपोटी आम्ही हे करतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही व्यवस्था आपण विकसित केली आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा


मारूती महाराज कारखाना परिसरात लवकरच सीएनजीची जोडणी बॉयलरला करून खर्चाची बचत व उत्पादनात वाढ करणे तसेच डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. सध्या साखर कारखान्यात शंभर ते दीडशे कामगार काम करत असून कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून कमी पडणार नाही असे ही यावेळी पालकमंत्री देशमुख बोलताना म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर