Truck Carrying Pipes Overturns Near Umarga Reta Pati: उमरगा रेतू पाटीजवळ पाइप घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक एक तास ठप्प झाली.
जळकोट: शिरूर ताजंबद ते मुखेड रस्त्यावरील उमरगा रेतू पाटीजवळ मंगळवारी (ता. २६) सकाळी साडेआठला पाइप घेऊन जाणारा ट्रक उलटला. त्यात दुचाकीवर हे पाइप पडले. या अपघातात ट्रकमधील एकजण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.