Corona : उमरग्यातील गुंजोटी, तुरोरीतील दोन बाधितांचा मृत्यू, चौघे पॉझिटिव्ह, एकूण संख्या ९२ वर

अविनाश काळे 
Wednesday, 15 July 2020

तालुक्यातील गुंजोटी येथील एका व तुरोरी येथील एका जेष्ठ नागरिकाचा बुधवारी (ता. १५) येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी सकाळी आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील एका व तुरोरी येथील एका जेष्ठ नागरिकाचा बुधवारी (ता. १५) येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी सकाळी आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात शहरातील माजी नगरसेविकेवर उपचार सुरु आहेत. तर एका व्यक्तीवर लातूर येथे उपचार सुरु आहेत. अन्य दोघांत शहरातील एकोंडीरोड परिसरातील एक व्यक्ति तर एका महिला कर्नाटकातील आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

शहरातील सहा तर तुरोरी व गुंजोटी प्रत्येकी एक असे आठ जणांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यात गुंजोटी व तुरोरी येथील जेष्ठांचा समावेश होता. गुंजोटीच्या जेष्ठ नागरिकाला उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे परत येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.  सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर तुरोरी येथील एका जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघावर कोविड नियमावली अंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

बधितांची संख्या पोहचली ९२ वर
२७ जुनपूर्वी सतरा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. त्यात बेडग्याच्या एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. २७ जूनपासुन मात्र समुदाय संपर्कामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे ती ७५ झाली आहे. त्यात यापूर्वी बलसूर, एकोंडी (जहागीर ) व तुरोरी येथील तीन जेष्ठांचा मृत्यू झाला होता. आता बुधवारी एका दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ९२ झाली आहे. दरम्यान माजी नगराध्यक्षाच्या पत्नी तथा माजी नगरसेविकेचा सोलापूर येथून अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, बुधवारी स्वतः माजी नगराध्यक्ष यांनी कुटुंबासह स्वॅब घेण्यासाठी कोविड रुग्णालयात दाखल झाले आहेत.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, प्रशासनाकडून उपाययोजना व जनजागृती सुरु असली तरी नागरिकांनीही स्वतःहुन काळजी घेतली पाहिजे. बुधवारी दोन जेष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, त्यांच्या पार्थिवावर कोविड पध्दतीने अंत्यविधी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधिक्षक 

(संपादन : प्रताप अवचार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga two preson death and four new corona patients