सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!

प्रताप अवचार
Wednesday, 24 June 2020

गावातील तरुणांनी खोदकाम करून ही शिवपिंड बाहेर काढली.या पिंडीची विधिवत पूजा करून गावाच्या हनुमान मंदीरात प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. 

औरंगाबाद : शहरापासून जवळच असलेल्या सावंगी गावातील सय्यद कब्रस्तानाच्या कडेला प्राचीन काळातील महादेवाची पिंड आढळून आली आहे. ही वार्ता कळताच गावकऱ्यांनी पिंड पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या. 
यावेळी सावंगीचे पोलीस पाटील, माजी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी खोदकाम करून ही शिवपिंड बाहेर काढली. या घटनेची माहिती हर्सूल पोलीस ठाण्याला देण्यात आली. या पिंडीची विधिवत पूजा करून गावाच्या हनुमान मंदीरात प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी गावालगत खाम नदी आहे. या नदीच्या जवळच सय्यद कब्रस्तान आहे. शेळीपालन करणारे कैलास भालेराव हे नदीच्या काठाला नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन गेले. यावेळी कब्रस्तानाच्या कडेला त्यांना नक्षीकाम केलेला दगड आढळला. त्यांनी तत्काळ थोडे खोदकाम करून पाहिले. तर शिवपिंड असल्याचा अंदाज आला.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

त्यांनी तत्काळ माजी सरपंच दामोदर भालेराव यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गावातील तरुण मंडळी जमा झाले. पोलीस पाटील दादासाहेब जगदाळे यांना बोलविण्यात आले. जगदाळे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून तरुणांना खोदकाम करण्यास सांगितले. खोदकामात महादेवाची पिंड असल्याचे आढळली. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

सुंदर नक्षीकाम 
या शिवपिंडीवर व बाजूच्या कडेला अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. नदीकाठी पूर्वी अनेक हिंदू मंदिरे असत. काळाच्या ओघात ही मंदिरे मोडकळीस येत गेली. त्यात वाढले शहरीकरण व अतिक्रमण यामुळे मंदिराची जागा लोप पावत गेली. नदीकाठी ही शिवपिंड आढळून आल्याने या ठिकाणी मंदिर असेल अशी चर्चा गावकऱ्यांत सुरू झाली. 

सय्यद कब्रस्तानाच्या कडेला नक्षीकाम असलेली शिवपिंड आढळून आली. गावातील तरुणांनी खोदकाम करून ती बाहेर काढली आहे. गावात असलेल्या हनुमान मंदिरात तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना देखील माहिती कळविली आहे. अशा प्रकारचे शिवपिंड आढळून येणे गावासाठी शुभच आहे. 
दादासाहेब जगदाळे, पोलीस पाटील, सावंगी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawangi town found shivpind