
उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टी किसन मारोती वानखेडे यांना उमेदवारी दिली हाेती, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साहेबराव दत्तराव कांबळे यांना उमेदवार दिली. या निवडणूकीत किसन वानखेडे यांना 1 लाख 08 हजार 682 तर साहेबराव कांबळे यांना 92 हजार 015 मते मिळाली. मात्र किसन वानखेडे 16 हजार 629 मते मिळवून विजयी झाले आहेत.