Unidentified Person Sets Car on Fire
sakal
अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे घरासमोर उभी केलेली हुंडाई एक्स्टर कार अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केल्याची घटना गुरुवार (ता. १२ ) रोजी पहाटे सुमारे २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेत कारचे अंदाजे १ लाख ५० हजार ते १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.