अर्धापूर - शहरातील पूर्व वळण रस्त्यावर झालेल्या ट्रक दुचाकी अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातात जखमी झालेले दोघे भाऊ लोणी खुर्द (ता. अर्धापूर) येथील येथील असुन या आपघातात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या दुसऱ्या भावाला नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या आपघामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असुन गावावर शोककळा पसरली आहे.