

Dharashiv News
esakal
धाराशिव: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील बळीराजासमोर आता एक नवीन तांत्रिक संकट उभे ठाकले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील फळबागा आणि रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र, धक्कादायक वास्तव असे आहे की, जिल्ह्यातील तब्बल ७६.१ टक्के शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या पिकांची ''ई-पीक पाहणी'' नोंदणी केलेली नाही. त्यामुळे नुकसान होऊनही केवळ या नोंदणीअभावी हजारो शेतकरी शासकीय मदत आणि पीकविमा भरपाई लागू झाल्यास त्याच्या लाभापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.