
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात बेमोसमी पावसाने वादळ, वाऱ्यासह सतत हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यानी शेतात काढलेल्या कांद्याची पावसामुळे पुरती वाट लागली आहे. पावसाने कांदा भिजून अक्षरशः सडून गेला आहे. यामुळे कांदा सडतो शेतकरी रडतो अशी म्हणण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.