Crop Damage: तळेगावात बेमोसमी पावसाने मका कापूस पिकांचे मोठे नुकसान
Agricultural Damage: तालुक्यातील तळेगाव परिसरात शुक्रवारी (ता.१९) रात्री झालेल्या अचानक बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मका, कापूस ही प्रमुख पिके या पावसामुळे जास्त प्रभावित झाली असून, काही ठिकाणी पिके आडवी पडली तर काही ठिकाणी कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.