four vehicles accidentsakal
मराठवाडा
Kej Accident : चार वाहनांचा विचित्र अपघात; जिवितहानी टळली
मालवाहू ट्रक, बस, जीप व कार या चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना केज बसस्थानकासमोर घडली.
केज - मालवाहू ट्रक, बस, जीप व कार या चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता. ०२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास केज बसस्थानकासमोर घडली. कायम गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या अपघातात सुदैवाने जिवितहानी टळली.