Jalna News : गावठी कट्ट्याचा वाढतोय वापर; दोन वर्षांत २३ गावठी पिस्तूल, ४४ जिवंत काडतूस जप्त

जिल्ह्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलांचा मार्गाचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही
use of gavthi katta pistol in two years from 23 pistols 44 live cartridges seized jalna marathi news
use of gavthi katta pistol in two years from 23 pistols 44 live cartridges seized jalna marathi newsesakal

जालना : जालना शहर हे स्टील आणि सीड्स सीटी म्हणून ओळखली जाते. मात्र, या जिल्ह्यात आता गुन्हेगारी वाढत असून पोलिस रेकॉर्डवरील आरोपींकडून चक्क गावठी कट्ट्यांचा वापर होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या गावठी कट्ट्यांचे लोण परराज्यातून जिल्ह्यात आले आहे.

जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांकडून तब्बल २३ गावठी पिस्तूल आणि ४४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत. मात्र, जिल्ह्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलांचा मार्गाचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही.

जिल्हा हा उद्योगनगरी आहे. त्यामुळे येथे रोज कोट्यवधींची उलाढाल होते. स्टील, सीड्स उद्योग आणि व्यापारी वर्गामुळे येथे जिल्ह्यासह इतर भागांतून अनेक खरेदीसाठी येतात. त्यामुळे जिल्ह्यात वाटमाऱ्या,

घरफोड्या, लूटमारी अशी घटना यापूर्वी अधिक प्रमाणात घडल्या आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांकडून गुन्हे करताना गावठी पिस्तूलचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांसमोर हे गावठी पिस्तुलांचे जाळे संपुष्टात आणण्याचे आव्हान आहे.

जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत जिल्ह्यात २३ गावठी पिस्तुलांसह ४४ जीवंत काडतूस पोलिस प्राशनाने जप्त केले आहेत. मात्र, जिल्ह्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलांच्या मुळाशी पोलिसांचा तपास गेलेला नाही. त्यामुळे गावठी पिस्तूल आवक कशी थांबणार? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

परराज्यातून गावठी पिस्तुलांची आवक

जिल्ह्यात येणाऱ्या गावठी पिस्तूल परराज्यातून येतात. या प्रामुख्याने उत्तरप्रेदाशातील बऱ्हानपुर येथून येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वाटमारी, लूटमारी आणि खुनाच्या गुन्ह्यात पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गावठी पिस्तुलाचा वापर होत असल्याचे चित्र या पूर्वीच्या गुन्ह्यांत पाहण्यास मिळाले आहे. यावर जरब बसणे आवश्यक आहे.

खबऱ्यांना अॅक्टिव्हेट करावे लागणार

जिल्ह्यात इतर राज्यांतून येणाऱ्या गावठी पिस्तूलचा प्रवास थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. उत्तरप्रदेशातून येणारे गावठी कट्टे जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या हाती पडण्यापूर्वीच ते जप्त करण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचे प्लॅनिंग होणे अपेक्षित आहे. यासाठी पोलिसांनी खबऱ्यांना एक्टिवेट करावे लागणार आहे.

इतर जिल्ह्यांतून अवैधरीत्या गावठी पिस्तुलांची विक्री केली जाते. या गावठी पिस्तूल पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून खरेदी करून गुन्ह्यात वापरल्या जातात. त्याअनुषंगाना आता २३ गावठी कट्ट्यांसह ४४ जिवंत काडतूस जप्त केल्या आहेत. नागरिकांकडे जर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांची माहिती असले तर ती पोलिसांना द्यावी, गावठी पिस्तुलांची माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील.

— रामेश्‍वर खनाळ, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com