Video: चक्क बैलांना दोडक्याची वैरण !

file photo
file photo
Updated on

झरी (जि. परभणी) : कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. राज्यातील शेतकरी या परिस्थितीमुळे देशोधडीला लागत आहे. शेतात पिकलेला शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठच खुली नसल्याने अखेर शेतकऱ्यांना पिकांची नासाडी उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे. झरी (ता.जि.परभणी) येथील शेतकरी गोपाळ देशमुख या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याने तर दोडका व भेंडीचे पिक चक्क बैंलाच्या वैरणीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे.

झरी येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाळ कमलाकर देशमुख यांनी उन्हाळी नाग कळ्या कंपनीचा ३२ गुंठे  दोडका लावला होता. विशेष म्हणजे भारनियमनाअभावी रात्री-बेरात्री  सदरील दोडक्याची पाणी देऊन नियोजन केले. दोडक्याचे पिक चांगल्या पद्धतीने आले. दररोज दोन क्विंटल मालही निघू लागला. पण लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापासून बाजारपेठे अभावी दोडका व भेंडी बैलाची वैरण म्हणून वापर करू लागले आहेत. मेहनत करून दोडका व भेंडी पिकांची लागवड केली.  तीन महिन्यापासून या दोडके विविध प्रकारचे खते किटकनाशक फवारणी करून दोडका निघण्यास सुरुवात झाली. आणि भागात कोरोना विषाणुची लागण लागण्याचा प्रकार सुरू झाला. 

बेभाव विकून सुद्धा खरेदीदार मिळेना
२८ - २९ दिवसापासून सदरील दोडका हा बेभाव विकून सुद्धा खरेदीदार नसल्यामुळे अक्षरशः हैराण झालेल्या शेतकरी गोपाळ देशमुख यांच्यावर हे दोडके आपल्या बैलाला वैरण म्हणून खाऊ घालण्याची वेळ आली आहे. सध्या देशात कोरोना महामारी सारख्या रोगामुळे लॉकडाउन चालू असून संपूर्ण देश बंद असताना एक लाख रुपये खर्च करून दोडका व भेंडीचे त्यांनी योग्य पद्धतीचे नियोजन केले खरे, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दहा रुपये किलो याप्रमाणे गावात विकवा लागत आहे. दोडका दर दिवसाला दोन क्विंटल निघत असल्यामुळे तसेच परभणी सारख्या ठिकाणी जाण्यास वाहनाचे नियोजन नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी आपल्या बैलाला वैरण म्हणून दोडके खाऊ घातले आहे.



संपूर्ण बाजारपेठच बंद
महिण्याभरापासून दोडका व भेंडीचे उत्पादन सुरु झाले होते. यंदा उत्पादन चांगले आले. परंतू कोरोनामुळे संपूर्ण बाजारपेठच बंद असल्याने हे पिक वाया जात आहे. बेभाव विक्री करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांना चारा म्हणून या दोडक्याचा उपयोग करावा लागत आहे.
- गोपाळ देशमुख, भाजीपाला उत्पादक शेतकरी, झरी (ता.परभणी)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com