esakal | सणासुदीच्या काळात नायगावसह पाडोळी, बोरगावमधील वीज पुरवठा खंडीत
sakal

बोलून बातमी शोधा

electricity down

पाडोळी सबस्टेशन अंतर्गत नायगाव, पाडोळी, बोरगाव वडगाव, वाटवडा, पिंपरी या गावाला येथून विज पुरवठा केला जातो.

सणासुदीच्या काळात नायगावसह पाडोळी, बोरगावमधील वीज पुरवठा खंडीत

sakal_logo
By
वैभव पाटील

नायगाव ( जि. उस्मानाबाद): विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर वर लोड येत असल्याचे कारण देत नायगावसह पाडोळी, बोरगाव येथील विज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खंडित केला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सणासुदीच्या काळात घरात वीज नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पाडोळी सबस्टेशन अंतर्गत नायगाव, पाडोळी, बोरगाव वडगाव, वाटवडा, पिंपरी या गावाला येथून विज पुरवठा केला जातो. पाडोळी सबस्टेशन मध्ये या 6 गावांसाठी दोन ट्रान्सफॉर्मर द्वारे विज पुरवठा केला जातो. परंतु नायगाव, पाडोळी, बोरगाव गावाला विजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर लोड घेत असल्यानचे सांगत येथील कर्मचारी विज पुरवठा खंडित करत आहेत त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

Gram Panchyat Election: निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, कोरोनामुळे विषेश काळजी

दिवसा विज गायब होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महिला सणासुदीच्या दिवसांत थंडीत देखील नळावर जागरण करून पिण्याचे पाणी भरत असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. येथील शेतकऱ्यांना शेतातील पशूंनच्या पाण्याची रात्री व्यवस्था करून ठेवावी लागते आहे.

दिवसभर मोबाईलची रेंज गायब

दिवसभर विज पुरवठा खंडित होत असल्याने येथील मोबाईल टॉवर बंद राहतं आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवसांत देखील अनेक जण नॉटरिचेबल राहत असल्याने उमेदवारांच्या प्रचारा यंत्रणेला आडकाठी होत आहे.तर‌ येथील सर्वच मोबाइलवर  बोलताना नागरिक हॅलो हॅलो बोलून परेशान होत आहेत.

"नायगाव, पाडोळीला विज पुरवठा होत असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर लोड येत आहे. त्यामुळे विज प्रवाह बंद ठेवावा लागत आहे. ऑइलची गळती होऊन ट्रान्सफॉर्मर पेट घेत आहे. त्यामुळे हा जळण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवस या वरील लोड कमी करुन विज पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील"

-लक्ष्मण पाटील,अभियंता कळब
 

  (edited by- pramod sarawale)         
        

loading image