Gram Panchyat Election: निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, कोरोनामुळे विषेश काळजी

रत्नाकर नळेगावकर
Thursday, 14 January 2021

सात ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने 42 ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान होणार आहे.

अहमदपूर (लातूर): तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने या ठिकाणी निवडणूक लागली होती. परंतु 7 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने शुक्रवारी 42 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

तालुक्यातील केंद्रेवाडी, नागझरी, तळेगांव, गादेवाडी, कौडगांव, वंजारवाडी, लिंगदाळ या ग्रामपंचायती बिनविरोध तर हाडोळती, उजना, माळेगांव (खु.), मोघा, टेंभूर्णी, गुगदळ,हगदळ, परचंडा,सलगरा, मुळकी,तेलगांव, सावरगांव (थोट), किनीकदू, धानोरा (खुर्द),खरबवाडी, उमरगा यल्लादेवी, गुट्टेवाडी,नरवटवाडी, येलदरवाडी, हंगरगा, ढाळेगांव, शेनकुड, मोहगाव, खानापूर (मो), ब्रम्हपूरी, आनंदवाडी, चिलखा, सोरा, आंबेगाव, बोडका, हिप्परगा कोपदेव, बेलूर, हासरणी, कोकणगा, चिखली, केंद्रेवाडी,मोळवण, हिंगणगाव, खंडाळी, धानोरा (बु.), माकणी, गोताळा, सुनेगांव शेंद्री या ठिकाणी निवडणूक लागली आहे.

हरणाच्या पाडसाला जीवदान! गावकऱ्यांची तत्परता

निवडणुकीत 24 हजार 624 महिला व 27 हजार 474 पुरुष असे एकूण  52 हजार 098 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक लागलेल्या 311 जागेसाठी 783 उमेदवार रिंगणात असून यासाठी 135 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. निवडणूक कामाकरीता बुथ  640 , पोलिस 135, शिपाई 135, निवडणूक निर्णय अधिकारी 17, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 18, क्षेत्रीय अधिकारी 16, मास्टर ट्रेनर 22, इतर 40 असे 1023 कर्मचारी कार्यरत आहेत.

उदगीर तालुक्यातील तब्बल 48 मतदान केंद्र संवेदनशील घोषित

मतदान प्रक्रियेसाठी 135 इव्हीएम मशीन उपलब्ध असून त्यापैकी 16 राखीव ठेवण्यात आल्या आहेत.निवडणूक साहित्याच्या वाहतुकीसाठी 20 स्कूल बसची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर दक्षता घेतली जाणार असून आशा, अंगणवाडी स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

"निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यासाठी खाजगी 20 स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारांनी बुथवर असलेल्या आरोग्य कर्मचा-यांकडून तपासणी करावी.मतदारांनी मास्क वापरावा. कोरोनाग्रस्त किंवा क्वारांटाईन असणाऱ्या मतदारांनी शेवटच्या अर्ध्या तासात येऊन मतदान करावे."

प्रसाद कुलकर्णी, निवडणूक प्राधिकृत अधिकारी.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmedpur political news gram panchayat election latur breaking news