esakal | परभणी जिल्ह्यात एक लाख 65 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण : पालकमंत्री नवाब मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलीक

परभणी जिल्ह्यात एक लाख 65 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण : पालकमंत्री नवाब मलिक

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 65 हजार 992 व्यक्तीनी लस घेतली आहे. त्यापैकी एक लाख 13 हजार 558 व्यक्तींनी पहिला डोस व 15 हजार 101 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही रुग्णांचा अद्यापपर्यंत मृत्यू झालेला नाही अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी (ता. एक) दिली.

परभणी शहरासह जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही रुग्णाचा अद्यापपर्यंत मृत्यू झाला नाही, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. एक) आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार डॉ. राहूल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - भोकर तालुक्यात बालविवाह रोखला; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व भोकर प्रशासनाची तत्परता

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 65 हजार 992 व्यक्तीनी लस घेतली आहे. त्यापैकी एक लाख 13 हजार 558 व्यक्तींनी पहिला डोस व 15 हजार 101 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही रुग्णांचा अद्यापपर्यंत मृत्यू झालेला नाही, असे ते म्हणाले. या लसीकरण मोहिमेतून फायदाच होतो. हे स्पष्ट आहे, असे नमुद करीत जिल्ह्यात लसीकरण मोहिम प्रभावीपणे विशेषतः बुथनिहाय राबविण्या संदर्भात प्रशासनाद्वारे नियोजन केले जात आहे, असेही ते म्हणाले. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. केंद्र सरकारद्वारे या अनुषंगाने पुरवठा होत नाही, असा सूर ही पालकमंत्री मलिक यांनी व्यक्त केला. लसीकरण मोहिमेकरिता राज्य सरकार आवश्यक तेवढा पैसा खर्च करावयास तयार आहे, असाही दावा केला. लस आयात करावयास परवानगी मिळाल्यास लस आयातही करू असे ते म्हणाले.

टॉक्सी इंजेक्शनही उपलब्ध

कोरोनाबाधित रुग्णां करिता टॉक्सी इंजेक्शनचाही साठी जिल्हा प्रशासनाद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. टॉक्सीचे 10 इंजेक्शन प्रशासनाने मागविले होते. आवश्यक नुसार सहा रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना या इंजेक्शनची गरज भासेल ते प्रशासनाद्वारे मोफत उपलब्ध केले जाईल, अशी ग्वाही मलिक यांनी दिली. 30 हजार रुपये किंमतीचे हे इंजेक्शन आहे. परंतू प्रशासनाने ते मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. रेमडीसीव्हर या इंजेक्शनचा आवश्यक तो साठा उपलब्ध आहे. कोणताही तुटवडा नाही. आवश्यकते नुसार इंजेक्शन उपलब्ध केले जात आहे, असेही नमुद केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top