esakal | भोकर तालुक्यात बालविवाह रोखला; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व भोकर प्रशासनाची तत्परता

बोलून बातमी शोधा

बालविवाह
भोकर तालुक्यात बालविवाह रोखला; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व भोकर प्रशासनाची तत्परता
sakal_logo
By
बाबूराव पाटील

भोकर ( जिल्हा नांदेड ) : बालविवाहाची प्रथा ही समाजात रुढ झाली होती. यावर शासनाने बंदी आणली आहे. काही महाभाग चोरीछुपे बालविवाह करुन मोकळे होतात. असाच काहीसा प्रकार पाकी धुळदेव (ता. भोकर) येथे गुरुवारी ( ता. २९) होत असल्याची माहिती येथील प्रशासनाला मिळताच त्या कुटुंबियांचे समुपदेश करुन होणारा विवाह रोखण्यात यश आले आहे.

मूलगी ही पराया धन आहे तेंव्हा आपलं कृतव्य पार पाडुन पालक मोकळे होतात. पण भविष्यात त्या बालीकेवर काय कठिण प्रसंग ओढावतात यांचा कसलाच विचार केला जात नाही. शासनाने यांचा गांभीर्याने विचार करुन अठरा वर्षांखालील मूलीचा विवाह करण्यास ऊशिरा का होईना बंदी घातली आहे.तेव्हांपासून अशा घटनांवर आळा बसला आहे. तसेच जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी आपल्या यंत्रणेला सक्त सुचना देऊन अशा प्रकारचे बालविवाह होत असतील तर त्या कुटुंबियांचे समुपदेशन करुन त्या घटना टाळाव्यात असे सांगितले आहे. एवढेच नाही तर चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कार्यालय यासाठी सतत कार्यरत असते. या कार्यालयाशी नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असतील तर कळवावे. संबंधीत व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येऊन अशा प्रकाराला आळा घालता येऊ शकतो.

हेही वाचा - कोरोना संकटात नांदेडची आरोग्य यंत्रणा प्रभारीच्या खांद्यावर; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज

समाजातील काही महाभाग मूलीच्या कमी वयातच "शुभमंगल" ऊरकुन मोकळे होण्याची घाई करतात. अशीच एक घटना गूरुवारी पाकी धुळदेव (ता. भोकर) येथे होत असल्याची गूप्त माहिती गटविकास अधिकारी जी. एल. रामोड, पोलिस निरीक्षक विकास पाटील, यांना मिळताच तात्काळ जिल्हा बालसंक्षरण अधिकारी विद्या आळणे, संदिप फूले यांना दिली. विद्या आळणे यांनी तेथील ग्रामविकास अधिकारी बी. के. पाटील यांना समवेत घेऊन ते त्या पालकांची व मुलीची प्रत्येक्ष भेट घेतली. आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व शिक्षेची तरतूद या विषयी समूपदेश केल्याने मन परिवर्तन झाले. मुलीचे वय विवाह योग्य झाल्यावरच आम्ही विवाह करु अशी ग्वाही त्या कुटुंबीयांनी संबंधीत अधिका-यांना दिली आहे. त्यामूळे बालविवाह रोखण्यास येथील प्रशासनाला अखेर यश आले आहे. तालुक्यात असा प्रकार कुठे होतं असेल तर शासनाला याची माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्याजिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे