
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज पवार (वय 44) यांची अज्ञात मारेकऱ्याने आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही हत्या नेमकी का आणि कुणी केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.