बीड - व्हाईट कॉलर गुन्हेगार पोलिस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळताच त्यांना चेस्ट पेन, अस्वस्थता अशा वैद्यकीय तक्रारी होतात आणि कोठडीऐवजी दवाखान्याच्या बेडवर आराम करतात. तसेच, वाल्मिक कराड यानेही छातीत दुखतेय, दम भरतोय, चक्कर येतेय अशा तक्रारी केल्या. पण, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला दवाखान्यात अॅडमिट करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिल्याने वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहात जावे लागले.