
मस्साजोगचे सरपंच संतोष देमशुख यांच्या हत्या प्रकरणातीली मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या जुन्या साथीदाराने खळबळजनक असे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगर यानं धक्कादायक असे आरोप पत्रकार परिषदेत केले. माझ्यासमोरच वाल्मीक कराडनं तिघांना मारलं असून त्याचा मी साक्षीदार आहे असं विजयसिंह बांगरने म्हटलंय.