Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई
Drug seizure news Maharashtra: वाशी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत ७२.८४ लाख किमतीच्या ४८५ किलो अफूची झाडे जप्त. दसमेगाव शिवारातील शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल.
वाशी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, दसमेगाव ता.वाशी शिवारात सुरू असलेल्या अफूच्या बेकायदेशीर शेतीवर वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.