सरपंचाच्या वाहनावर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fakrabad Shooting on Sarpanch vehicle

सरपंचाच्या वाहनावर गोळीबार

वाशी : तालुक्यातील फक्राबाद येथील सरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड यांच्या चारचाकी वाहनावर दोन अनोळखी युवकांनी गोळीबार केला. ही घटना शुक्रवारी फक्राबाद ते पारा रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यात बिक्कड थोडक्यात बचावले.

मिळालेली माहिती अशी : बिक्कड हे शुक्रवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास फक्राबाद येथून पाऱ्याकडे चारचाकी वाहनातून (एमएच २५ एडब्ल्यू ६८६८) जात होते. मांजरा नदीचा पूल ओलांडून ते पुढे आल्यानंतर मास्क लावलेले दोन तरुण रस्त्यात थांबलेले त्यांना दिसले. दोघांनीही बिक्कड यांच्या वाहनाला हात दाखवला. त्यांना पारा येथे यायचे असेल असे समजून बिक्कड यांनी वाहन थांबवले.

मात्र, वाहन थांबताच काही कळण्याच्या आतच दोघांपैकी एकाने वाहनाच्या समोरच्या डाव्या बाजूने बिक्कड यांच्या दिशेने एक गोळी झाडली. ही गोळी समोरच्या काचावर लागली. प्रसंगावधान राखत बिक्कड यांनी वाहन वेगात पारा गावाच्या दिशेने पळवले. यानंतर हल्लेखोरांनी मागूनही वाहनावर एक गोळी झाडली. पारा येथे आल्यानंतर बिक्कड यांनी काही ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. भेदरलेल्या बिक्कड यांना ग्रामस्थांनी पारा येथील रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

मिळाली काडतुसाची पुंगळी

घटनास्थळावर पोलिसांना काडतुसाची एक पुंगळी मिळाली. शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक सुरेश दळवे, पोलिस उपनिरीक्षक पवन निंबाळकर उपस्थित होते.

Web Title: Vashi Taluka Fakrabad Shooting On Sarpanch Vehicle

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top