Vasmat Assembly Election : वसमत विधानसभेत महायुतीत बंडखोरी! शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख राजु चापके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना शिंदे गटाचे राजु चापके यांनी शुक्रवार ता. २५ बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
raju chapke
raju chapkesakal
Updated on

वसमत - शिवसेना शिंदे गटाचे राजु चापके यांनी शुक्रवार ता. २५ बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी महायुतीमधून उमेदवारीची मागणी केली होती.

राजु चापके हे शिवसेना शिंदे गटाचे वसमत तालुका प्रमुख आहेत. तालुका प्रमुख जरी असले तरी त्यांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. तसेच पुर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरीकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com